Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ग्राम पंचायत निवणुकीत भाजपचा विस्तार झाला – देवेंद्र फडणवीस
![# Covid-19: Maharashtra government fails to handle Corona situation- Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/devendra.jpg)
मुंबई – ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मागे टाकून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधानपरिषद निवडणुकीतील पराभव हा तात्पुरता होता. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांची राजकीय स्पेस कमी झाली आहे. ही स्पेस भाजपने व्यापल्यामुळे आमच्या पक्षाचा या निवडणुकीत विस्तारच झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
50 टक्के ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा विजय होईल, असंही फडणवीस सांगितले. राज्यात निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टी झाली तेव्हा खूप घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात मदत काहीच मिळाली नाही. त्यावेळी मोदी सरकारने महाराष्ट्राला मदत दिली. पण राज्य सरकारने काहीच दिलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला, असे फडणवीस यांनी म्हटले.