“गोकुळ’ची गायीच्या दुधाच्या खरेदी दरात कपात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/milk-.jpg)
कोल्हापूर – गायीचे दूध खरेदी दर शासनाने एका आदेशाद्वारे निश्चित करूनही हा आदेश धाब्यावर बसवून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने मंगळवारी गायीच्या दूध खरेदी दरातही प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली. हा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याची अंमलबजावणी 21 जूनपासून करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने 6 जून 2018 रोजी एका आदेशान्वये गायीच्या 3.2 टक्के फॅट व 8.3 एसएनएफ दुधासाठी प्रतिलिटर 26.10 रुपये, तर 4.5 फॅटसाठी प्रतिलिटर 30 रुपये निश्चित केला आहे. शासनाने निश्चित केलेला हा दर उत्पादकांना देणे बंधनकारक आहे. तरीही “गोकुळ’कडून कार्यक्षेत्रातील गायीचे दूध प्रतिलिटर 25 रुपये, तर कार्यक्षेत्राबाहेरील दूध प्रतिलिटर 20 रुपये दराने खरेदी केले जात होते. मुळातच शासनाचा आदेश धाब्यावर बसवलेला असताना आज पुन्हा खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय संघाने घेतला.