breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ‘जेईई मेन्स’च्या कटऑफमध्ये वाढ

वर्षांतून दोन वेळा परीक्षा झाल्याचा विद्यार्थ्यांना फायदा

नुकत्याच जाहीर झालेल्या ‘जेईई मेन्स’ या प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी कटऑफमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कटऑफमध्ये झालेली वाढ पाहता विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी गेली असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदाच दोन वेळा जेईई मेन्स घेण्याच्या निर्णयाची कार्यक्षम अंमलबजावणी करण्यात राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा (एनटीए) यशस्वी ठरली आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जेईई मेन्स या परीक्षेच्या माध्यमातून आयआयटी, एनआयटी अशा संस्थांमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थी निवडण्यात येतात. मेन्समधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडव्हान्स परीक्षा द्यावी लागते. अ‍ॅडव्हान्समधील गुणांनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या वर्षी पहिल्यांदाच जानेवारी आणि एप्रिल अशा दोन वेळा झालेल्या परीक्षांतून सर्वोत्तम पर्सेटाइल मिळालेले साधारण २ लाख २४ हजार विद्यार्थी अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरतील. या वर्षी खुला गट (८९.७५), आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक (७८.२१), इतर मागासवर्गीय (७४.३१), अनुसूचित जाती (५४.०१), अनुसूचित जमाती (४४.३३) असा कटऑफ आहे. या परीक्षेच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर तज्ज्ञांनी त्यांची निरीक्षणे नोंदवली.

‘विद्यार्थ्यांना जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका सोप्या वाटल्या असाव्यात. कारण, एप्रिलमध्ये परीक्षा दिलेल्या सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांच्या पर्सेटाइमध्ये सुधारणा दिसत आहे.

दोन वेळा परीक्षा घेण्याच्या निर्णयाचाही विद्यार्थ्यांच्या पर्सेटाइलवर परिणाम दिसत आहे. जेईई मेन्स ज्या कार्यक्षमतेने झाली, ते पाहता यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या एमएचटी सीईटीमध्ये त्याचे अनुकरण होणे आवश्यक आहे,’ असे मार्गदर्शक प्रीतम सेनगुप्ता यांनी सांगितले.

प्रवेश परीक्षा तज्ज्ञ दुर्गेश मंगेशकर  म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी जेईई मेन्सचा कटऑफ वाढला आहे. २०१८ मध्ये ७४ आणि २०१७ मध्ये ८२ कटऑफ होता. कटऑफ वाढला याचा अर्थ प्रश्नपत्रिका सोप्या होत्या असाही निघू शकतो. प्रश्नपत्रिका सोप्या असल्याने विद्यार्थ्यांचे गुण वाढले. कदाचित वर्षांतून दोन वेळा परीक्षा झाल्यामुळेही एकूण गुण वाढले असण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञ  म्हणतात..

यंदाचा  कटऑफ २०१६ मधील कटऑफप्रमाणे आहे. २०१६ मध्ये १०० कटऑफ होता. प्रत्येक पर्सेटाइलला १० ते ११ हजार विद्यार्थी आहेत, असेही दिसून येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, परीक्षा आणि निकाल ही प्रक्रिया वेळेत पार पडली. विद्यार्थ्यांना दोन संधी मिळाल्याने त्यांच्यावरील दडपणही बऱ्याच प्रमाणात कमी झाले.’ जेईई मेन्समधील बदल यशस्वी झाल्याने आता त्याच धर्तीवर ‘नीट’ परीक्षेची कार्यपद्धतीही निश्चित करायला हरकत नाही. तसेच ‘एक देश एक परीक्षा’ ही संकल्पना समोर ठेवून राज्य पातळीवरील अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या सीईटी रद्द करता येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button