Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
गॅस सिलिंडर स्फोटात चिमुरडीचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/fire-2.jpg)
कुर्ला येथील बैल बाजार परिसरातील घरात गुरुवारी सायंकाळी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात चार वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला.
बैल बाजारातील क्रांतीनगर येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गॅस सिलिंडरचा स्फोटामुळे घराला आग लागली. यावेळी घरात अनुष्का चौरसिया (४) ही एकटीच होती. तिचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर रवी परमार (२१) हा तरुण जखमी झाला.
अरुंद गल्ल्यामुळे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यात अडचणी येत होत्या. अखेर विमानतळावरील अग्निशमन दलाने विमानतळ परिसरातून आगीवर नियंत्रण मिळवले. याबाबत विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.