गुटखा खरेदी आणि विक्रीवर स्वतंत्रपणे कारवाई करण्यासाठी पोलिसांना राज्य सरकारची परवानगी
महाराष्ट्रात यापुढे गुटखा खरेदी आणि विक्रीच्या प्रकरणात स्वतंत्रपणे कारवाई करण्यासाठी पोलिसांना परवानगी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे हा महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. गुटखा व तत्सम पदार्थांवर राज्यात विक्रीला बंदी आहे मात्र तरीही बऱ्याच ठिकाणी याची विक्री होते. अशा प्रकरणात यापूर्वी तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना खाद्य एवं औषध प्रशासनची परवानगी घ्यावी लागत होती मात्र आता यापुढे स्वतंत्ररित्या महाराष्ट्र पोलीस अशा प्रकरणात गुन्हा दाखल करू शकणार आहेत.
राज्यात अगोदरपासूनच असणाऱ्या गुटखा बंदी ची अंमलबजावणी अधिक कठोर रित्या करण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही नवी योजना करण्यात आली आहे. यापुढे पोलीस गुटखा विक्रेते तसेच तस्करी प्रकरणात आढळणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करू शकणार आहेत. पोलीस महानिरीक्षक, मिलिंद भारंबे यांनी यासंदर्भात 16 जुलै रोजी पत्रकाद्वारे माहितीही दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 5 जुलै रोजी एक विशेष बैठक पार पडली होती. त्यात यासंदर्भात माहिती दिली गेली तसेच गुटखा विक्रेत्यांवर भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला जावा असेही सांगण्यात आले. 2012 पासूनच राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे तरिही गुटख्याची विक्री होतच आहे.त्यामुळे आता यावर कडक कारावई करण्याचे अजित पवार यांनी आदेश दिले आहेत.