खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांचा पुन्हा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/download-3-1.jpg)
मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिकेकडून त्यांना पुढील काही दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांना १६ ऑगस्टला रात्री मुंबईच्या लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना १५ ऑगस्टला रात्री लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर काल (१७ ऑगस्ट) पालिकेच्या डॉक्टरांकडून त्यांची कोरोना चाचणी करुन घेतली. त्यावेळी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती मात्र पालिकेच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांकडून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.