Breaking-newsमहाराष्ट्र
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना बंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Mahalaxmi-Temple-Kolhapur.jpg)
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. देवस्थानच्या महाराष्ट्रातील ३ हजार मंदिरांमध्ये हाच निर्णय लागू करण्यात आला आहे. अशा कपड्यांमध्ये मोबाइलवरून फोटो काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या मंदिरात भाविक येत असतात या सगळ्यांनी भारतीय पोशाखातच आले पाहिजे. हा पोशाख अंगभर असावा, अंगप्रदर्शन करणाऱ्या किंवा तोकड्या कपड्यांमध्ये भाविक आल्यास त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. पुरुष असो किंवा महिला सगळ्यांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. जे भाविक या मंदिरात येतात त्यांना अशा लोकांकडे पाहून मनात लज्जा उत्पन्न होते, तसेच अनेक भाविक यासंबंधी तक्रारीही करत होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असेही देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.