breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोना, राज्यात 304 पैकी 289 रुग्ण निगेटीव्ह

पुणे |महाईन्यूज|

ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विलगीकरण कक्षांत आतापर्यंत 304 जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने ‘कोरोना’करिता निगेटिव्ह आले असून, त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले; तर पाच जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 12 जणांना पुण्यात; तर तिघांना मुंबईतील रुग्णालयात भरती केले आहे.

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत एक हजार 101 विमानांमधील एक लाख 29 हजार 448 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांनी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या कोरोना विषाणूंचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button