केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/doctor-jj_201808121855.jpg)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे.
केरळमध्ये मुसळधार पावसाने आणि पुराने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 21 हजार कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला रवाना होत आहेत. सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 आणि पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टर्सची टीम एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे.