कृष्ण अष्टमीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/EfLvpzGUMAIQKje-1.jpg)
महाराष्ट्रामध्ये 11 ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर आज गोपाळकालाचा दिवस आहे. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे दरवर्षी प्रमाणे गोपालकाला साजरा करता येणार नाहीये. त्यामुळए घरच्या घरीच सर्वांनी भगवान श्रीकृष्णाची पुजा करून हा दिवस साजरा केलाय.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-37.jpg)
दरम्यान भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णाने पृथ्वीवर श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी जन्म घेतला अशी हिंदू धर्मामध्ये अख्यायिका आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरामध्येही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गोकुळाष्टमी निमित्त विठ्ठल- रूक्मिणीचे मंदिर आणि गाभारा झेंडू व अस्टरच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. पिवळ्या, नारंगी झेंडूमध्ये पांढर्या रंगाच्या अस्टरची फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना संकटामुळे महाराष्ट्रात अद्याप कुठलेच प्रार्थनास्थळ उघडलेले नाही. त्यामुळे विठ्ठल रूक्मिणीच्या देवळातही आज भक्तांविनाच नित्य पूजा करण्यात आली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/EfLvpzGUMAIQKje-1024x694.jpg)
पंढरपूरमध्ये महत्त्वाच्या सणाला आकर्षक फूलांची सजावट करण्याची पद्धत आहे. सणा-वाराच्या निमित्ताने आकर्षक सजावट करून आनंद द्विगुणित केला जातो. सध्या लॉकडाऊनमध्येही ही प्रथा मंदिर परिसरामध्ये कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान आज मंदिरातली डोळे दिपवून टाकणारी ही फुलांची सजावट पाहिली की मनाला एक वेगळीच शांतात आणि साक्षात देवाच्या गाभाऱ्यात असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही.