कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा यंदा साधेपणाने होणार साजरी
![Kunkeshwar's Mahashivaratri Yatra will be celebrated simply this year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/kunkeshwar-yatra.jpg)
सिंधुदुर्ग – कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा देवगड तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्रकुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा गावपातळीवर साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे , तसेच बाहेरून येणार्या भाविक ,पर्यटक भजनी मंडळे ,व्यापारी , संप्रदायिक मंडळी आणि पाहुणे मंडळींना यात्रेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती कुणकेश्वर ग्रामस्थ आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने दिली आहे.
यंदा कुणकेश्वरची यात्रा 11 ते 13 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. मात्र कोरोनामूळे यंदाची यात्रा दरवर्षीसारखी गजबजलेली न दिसता साधेपणाने ग्रामस्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. मंदिरामध्ये यात्रा काळात होणारे धार्मिक विधिवत पूजा कार्यक्रम मात्र केले जाणार आहेत.शासनाने आखून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करून ही यात्रा पार पडणार आहे. तरी बाहेरून येणारे भाविक, व्यापारी, पाहुणे, पर्यटक आणि आजूबाजूची मंडळी यांनी यात्रेत 11 ते 15 मार्च या कालावधीत प्रत्यक्ष सहभागी न होता सहकार्य करण्याचे आवाहन कुणकेश्वर ग्रामस्थ आणि मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.