काँग्रेस नेते धीरज देशमुख रुग्णालयात दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Dhiraj-Deshmukh.jpg)
लातूर:- सध्या राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु असून उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याचा परिणाम अनेकांच्या तब्येतीवर होताना दिसत आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार असणारे धीरज देशमुख आजारी पडले असून त्यांना लातूरमधील रुग्णालयात करण्यात आलं आहे. धीरज देशमुख यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत यासंबंधी माहिती दिली आहे.
धीरज देशमुख यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता. पण प्रचारसभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झाले. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढले आहे”. सध्या आपण उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करावी असे कांहीं नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.