Breaking-newsमहाराष्ट्र
औरंगाबादमधून तलवारींचा साठा जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/swards-.jpg)
- मुख्य आरोपीस अटक : हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औरंगाबाद- औरंगाबादमध्ये आज तलवारींचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका घरातून 19 तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी आलिम खान रहीम पठाण (वय 35) याला अटक करण्यात आली आहे.
जहॉंगिर कॉलनीत राहणाऱ्या आलिम पठाण याच्या घरातून तलवारींची विक्री होत असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी पठाणच्या घरात छापा टाकून दोन तलवारी जप्त केल्या. पठाणच्या चौकशी कली असता त्याने 19 तलवारींची विक्री केल्याचे उघकीस आले. या तलवारी त्याने शेख मोहसीन शेख मतीन (चार तलवारी), नफीस शहा शरीफ शहा (तीन तलवारी), इलीयास कुरेशी (दोन तलवारी), शेख परवेज शेख महेराज, शेख आमेर शेख इकबाल, शेख समीर शेख अय्युब, शेख असर, शेख आवेज शेख मेहराज यांना प्रत्येकी एक तलवार दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सर्वांविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन चोरट्यांनाही अटक केली आहे. सूर्यकांत उर्फ सनी जाधव (वय 22) आणि स्वप्नील उर्फ मोगली कुलकर्णी (वय 25) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांच्याविरोधात घरफोडीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सात तोळे सोने, एक लॅपटॉप व दोन मोबाईल फोनचा समावेश आहे.