breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटीच्या मालवाहू बसेसच्या 543 फेर्‍या,मिळाला 21 लाख रुपयांचा महसूल

जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली लालपरी आता मालवाहतुकीच्या क्षेत्रातही उतरली आहे…आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढवण्याकरता एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.आतापर्यंत राज्यभरात एसटीच्या मालवाहू बसेसच्या ५४३ फेर्‍यांतून ३ हजार टनाची मालवाहतूक करण्यात आली आहे. त्यातून एसटीला २१ लाख रुपयांच्या महसूल देखील मिळाला आहे. त्यामुळे एसटीचे मालवाहू बसेस आता सुसाट धावत आहेत. त्याच्या निश्चित एसटी महामंडळाला फायदा देखील झाला आहे…

एसटी महामंडळाच्या प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत ७२ बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस कार्यरत आहेत. म्हणजेच ३७२ बसेस मालवाहतुकीसाठी सध्या उपलब्ध आहेत…

२१ मेपासून आतापर्यंत मालवाहतूक एसटीने ५४३ फेर्‍यांच्या माध्यमातून ३ हजार टन मालाची वाहतूक राज्याच्या कानाकोपर्‍यात केली आहे. त्यासाठी ९० हजार किमीचा प्रवास या वाहनांनी केला असून त्यातून एसटीला २१ लाखांचे उत्पन्न देखील मिळाले आहे. एसटी महामंडळाची राज्यात २५० आगार आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर ही आगार कार्यरत आहेत. याबरोबर ३१ विभागीय कार्यालये, ३३ विभागीय कार्यशाळा असा महामंडळाचा मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button