एका दिवसात डॉक्टर पदवी देणाऱ्याला पुणे पोलिसांचा ‘डोस’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/Doctor.jpg)
– कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हा दाखल
पिंपरी: बोगस प्रमाणपत्र देऊन डॉक्टर बनवणाऱ्या तोतयाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. अवव्या ४० हजारात नेचारो थेरपी डिप्लोमा अभ्यासक्रमाची पदवी देऊन एका दिवसात वैद्यकीय व्यवसाय कसा सुरु करायचा? याचा गोरख धंदा उजेडात आला आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणार्या पुण्यात असा प्रकार सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष डॉ.अभिषेक हरीदास यांना ग्रामीण बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, औरंगाबाद यांच्या वेबसाईवर माहिती मिळाली. त्या माहितीवरुन सदर संस्थेच्या वतीने ND – (नचरोथेरपी डिप्लामा ) ही पदवी देत असल्याचे दिसले. त्यानुसार या पदविधारकास स्वत: च्या नावापुढे ‘डॉक्टर’ असे लावून वैद्यकीय व्यवसायही करता येतो, असा दावा केला होता.
दरम्यान, संबधित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिद्र आगवन यांच्याशी पदवी घेण्यासंदर्भात फोनवर संपर्क केला त्यांनी पदवीचे नमुना सर्टीफीकेट व पदवी धारकास स्वत:च्या नावापुढे डॉक्टर लावून वैद्यकीय व्यवसाय करता येतो, असे सांगण्यात आले. तसेच माहितीपत्रक पाठवून पदवी घेण्यासाठी औरंगाबाद पळखेडा ता.कन्नड येथे बोलाविले. त्यानुसार हा नेमका प्रकार काय आहे? हे पाहण्यासाठी पत्रकार सुनिल जगताप व शाहील कांबळे यांच्यासह तेथे गेल्यावर डॉ. मच्छिंद्र आगवन यांनी एकादिवसात सर्व रेकॉर्ड तयार करुन पदवी देण्याकरीता एकुण ४७ हजार रुपयांची मागणी केली. सदर रक्कम चेकने देतो अस म्हटल्यावर त्यास त्यांनी नकार देवून सर्व रक्कम रोख स्वरुपातच द्यावे लागेल, असे सांगितले.
औरंगाबादमधील संस्था आणि पुण्यात शाखा…
विशेष म्हणजे, तुमच्याकडे आता पैसे नसतील, तर त्यांच्या संस्थेचे पुणे येथेही सेंन्टर आहे. तेथे डॉ. विश्वजीत चव्हाण , डॉ. प्रभु औरंगाबाद येथील डॉ. रत्नपारखी यांचे नंबर दिले. त्यावरुन डॉक्टर रत्नपारखी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोथरुड,पुणे येथील डॉ. विश्वजीत चव्हाण यांच्याकडे डॉ. अभिषेक हरीदास आणि विकास कुचेकर गेले त्याठिकाणी संबंधिताने डॉक्टरच्या पदवीचे सर्टीफीकेट नमुने दाखविले व वैद्यकीय व्यवसाय कसा करायाचा याची माहीती दिली. बँक खाते नंबर देवून त्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले.
पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली दाखल…
बोगस पदव्या देणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्याकरीता पुणे पोलिस आयुक्त शुक्ला यांना भेटून सर्व हकीगत सांगितली. पुणे पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार, कोथरुड पोलिस्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. आप्पासाहेब शेवाळे यांनी भा.द.वि.स कलम ४१९ , ४२०,३४ प्रमाने गुन्हा नोंद केला आहे. अशी माहीती मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे संचालक आण्णा जोगदंड यांनी दिली.