breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘आरे वाचवा’ मोहिमेला अवघ्या चार वर्षांत लोकचळवळीचे स्वरूप “समाजमाध्यमांवरून थेट रस्त्यावर”

मुंबई : सुमारे चार वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘आरे वाचवा’ ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेले पर्यावरणप्रेमी गरज पडल्यास रस्त्यावर उतरायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत, हे शुक्रवारी रात्री कारशेडच्या जागेवरील वृक्षतोड विरोधाच्या निमित्ताने दिसून आले. यात आंबेडकर महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ, टाटा सामाजिक विज्ञान संस्थांसह विविध महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी, नोकरदार, वकील, आयटी क्षेत्रात काम करणारे तंत्रज्ञ, छायाचित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी अशा अनेक स्तरांतील पर्यावरणप्रेमींचा सहभाग होता.

आरेमधील मेट्रो कारशेडच्या जागेवरील झाडे तोडण्यास सुरुवात झाल्याची पहिली चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाली. पाठोपाठ आरेमध्ये एकत्र येण्याचे संदेश फिरू लागले. त्यानंतर आरेमधील आदिवासींपासून, विरार, पनवेल येथून पर्यावरणप्रेमी तेथे दाखल झाले. ‘आरे वाचवा’ हा एका परिसराचा मुद्दा न राहता मुंबईच्या कानाकोपऱ्यातून त्याला पाठिंबा मिळाला. त्याशिवाय अटक झालेल्या पर्यावरणप्रेमींसाठी कायदेशीर मदत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्याच माध्यमातूनच मिळाली. अटक झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोमवारपासून सुरू होणार असल्यामुळे त्यांना जामीन मिळाला. हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आणि आरेमध्येच राहणारा स्वप्निल पवार हा या आंदोलनात सामील झाला. शुक्रवारी आरेत झाडे तोडली जात असल्याची चित्रफीत त्यानेच समाजमाध्यमांवर पाठविली. आरेमध्ये राहत असल्यामुळे आरेशी निगडित आहेच, पण या आंदोलनामुळे आणखीनच सक्रिय झाल्याचे तो सांगतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button