breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
‘असिफा’ला न्याय मिळावा, म्हणून पिंपरीतील विद्यार्थ्यांचा कॅण्डल मार्च
पिंपरी – जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये आठ वर्षीय चिमुकल्या असिफावर बलात्कार करुन तिची हत्या केली. त्या नराधमांला फाशीची शिक्षा करावी आणि असिफाला न्याय मिळावा, यासाठी पिंपरीच्या संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील फार्मास्युटीकल सायन्स अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी आज रविवारी (दि. 15) सायंकाळी साडेपाच वाजता कॅण्डल मार्च काढला.
हा कॅण्डल मार्च डी. वाय. पाटील इन्स्टिट्युट येथून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय समोरून वायसीएम रुग्णालय मार्गे काढण्यात आला. कॅण्डल मार्चची सांगता फार्मास्युटीकल सायन्स अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट येथे झाली. विद्यार्थी सुरज तिवारी याने सहका-यांच्या मदतीने मार्चची तयारी केली होती. अध्यक्ष रणविर सिंग यांचाही मार्चमध्ये सहभाग होता. सुमारे 500 विद्यार्थी सहभागी झाले होते.