breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अशोक चव्हाण यांच्या पत्नी काँग्रेसच्या स्टार प्रचारक !

राज्यात प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आमदार पत्नी अमिता चव्हाण यांना स्थान देण्यात आले आहे. नांदेड मतदारसंघाच्या बाहेर अमिताताईंना प्रचारासाठी कोण बोलविणार, असा सवाल काँग्रेस नेते करू लागले आहेत.

राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी काँग्रेसने ४० नेत्यांचा समावेश असलेली स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे.  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुत्राने भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून काँग्रेस नेत्यांनी विखे-पाटील यांना वाळीतच टाकले आहे. पण पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत विखे-पाटील यांनाही संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या या यादीत सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे आमदार अमिता चव्हाण यांचे. अशोक चव्हाण यांच्या आमदार पत्नी एवढीच त्यांची ओळख.

त्यांचे वक्तृत्वही फार काही नाही. नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याची शिफारस अशोक चव्हाण यांनी केली होती. पण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अशोकरावांनाच लोकसभा लढण्याचा आदेश दिला. नांदेडची उमेदवारी न दिल्याने त्याची भरपाई म्हणून अमिता चव्हाण यांना स्टार प्रचारक म्हणून संधी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button