breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पित्याला १५ वर्षे सक्तमजुरी

पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्याला विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी १५ वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली.

या प्रकरणातील मुलीला वेळोवेळी धमकावून पित्याने अत्याचार केले होते. या घटनेची माहिती आई तसेच भावाला दिल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. दरम्यान अल्पवयीन मुलगी दहावीत असताना गर्भवती राहिली होती. पीडित मुलीने सामाजिक कार्यकर्त्यां लता सोनवणे आणि एका मैत्रिणीला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पित्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश गवळी यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी अकरा क्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या होत्या.

आरोपी पित्याला कठोर शिक्षा देण्याची विनंती सरकारी वकील गवळी यांनी युक्तिवादात न्यायालयाकडे केली होती. आरोपीला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार १५ वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, बलात्कार केल्याप्रकरणी १५ वर्ष सक्तमजुरी  तसेच १० हजार रुपये दंड, विनयभंग केल्याप्रकरणी २ वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली.

सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करून हवालदार संजय जाधव, सुमित जगताप यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

मुलीला पुन्हा उभे करायचे आहे’

या प्रकरणात मुलीची आई आणि तिच्या नातेवाइकांनी पीडित मुलीवर मोठा दबाव आणला होता. या प्रकरणात माझी साक्ष झाली. या प्रकरणाचा पाठपुरावा केला. न्यायालयाने पित्याला शिक्षा सुनावली. माझ्या दृष्टीने हे प्रकरण संपलेले नाही. महाविद्यालयात चांगले गुण मिळवणाऱ्या मुलीला पुन्हा उभे करायचे आहे, असे या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां लता सोनवणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button