Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
अखेर निरंजन डावखरे यांचा भाजपात प्रवेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/niranjan-davkhare-.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत अखेर निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पदवीधर संघाची उमेदवारी निरंजन डावखरेंना जाहीर केली आहे. निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व चांगल्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही निरंजन डावखरेंना सोबत घेतलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तरुण तडफदार नेतृत्व मिळाल्याने भाजपाला फायदा होईल. एक चांगलं नेतृत्व मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.