breaking-newsमहाराष्ट्र

अकाउंटच्या अडचणींमुळे शिष्यवृत्ती अडकली

पुणे– राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी राजर्षी शाहू महाराज ईबीसी शिष्यवृत्ती ही राज्यातील काही विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या अकाउंटच्या अडचणींमुळे मिळालेली नाही. तर शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये नऊ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाली असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरुन समोर येते आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटला अडचणी आल्या असतील त्यांनी पुन्हा अर्ज करावेत. मात्र याबाबत आमच्या विभागाकडे पुरेशी माहिती नाही. शिष्यवृत्तीचे सर्व काम हे ऑनलाईन चालते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरुन याची माहिती घ्यावी.
डॉ.डी.आर.नंदनवार, सहसंचालक
तंत्रशिक्षण संचालनालय, पुणे विभाग

राज्य शासनाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधार नंबरशी संलग्न खात्याची माहिती तर दिली. मात्र, बहुतांशी विद्यार्थ्यांनी त्याचे क्रेडिट व डेबिट लिमिट न पहाता ते खाते सुरू ठेवले आहे. त्यामुळेच या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यास शिक्षण विभागाला अडचण निर्माण झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2017-17 च्या दुसऱ्या लॉटमध्ये राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शुल्काच्या निम्मे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांनी आपल्या उघडलेल्या खात्याची पुरेशी काळजीच न घेतल्याने काही खाती बंद करण्यात आली आहेत. काही बॅंकेकडून बंद झाली आहेत, काहींचे क्रेडिट लिमिट वाढले आहे तर काही ठिकाणी आणखी काही अडणची निर्माण झाल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची यादी तंत्रशिक्षण संचलनालयाने संकेतस्थळावर जाहीर करण्यत आली आहे. कोणत्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेमकी कोणती अडचण झाली आहे. याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात सध्याच्या आकडेवारीनुसार असे 682 विद्यार्थी असल्याचे दिसते आहे. यातील बहुतांशी विद्यार्थ्याचे वर्षाचे शुल्क दीड ते दोन लाख रुपये आहे. अशांना आता अडचणी सुधारुन अर्ज करावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button