breaking-newsमहाराष्ट्र

अकरावीच्या 28 हजार विद्यार्थ्यांनी भरले अर्ज

  • तर ऐंशी टक्‍के महाविद्यालयांची नोंदणीही पूर्ण

पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड येथे राबविण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 28 हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला आहे. तर जवळपास 80 टक्‍के महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मुंबई व नागपूरमधील प्रवेश प्रक्रिया पहाता अर्ज भरण्यात पुणे आघाडीवर असल्याचे दिसून येते आहे.
अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार 10 मे पासून अर्जाचा भाग एक भरण्याचे काम सुरु असून मागील सहा दिवसांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवडमधील 28 हजार 78 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
याबाबत माहिती देताना सहाय्यक शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत म्हणाल्या, अकरावीसाठी महाविद्यालयांची नोंदणी एकीकडे सुरु आहे. ऐंशी टक्‍के नोंदणी पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु आहे. यंदाच्या वर्षी बोर्डाकडील सर्व माहिती आपण अकरावीच्या प्रणालीला लिंक केल्यामुळे ही सर्व माहिती आपोआपच भरली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ बैठक क्रमांक टाकून समोर आलेली माहिती योग्य आहे की नाही ते तपासून अर्ज भाग एक भरायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण आहे त्या विद्यार्थ्यांनी ही सर्व कागदपत्रे तपासून घ्यायची आहेत.
आतापर्यंत 28 हजार 78 विद्यार्थ्यांनी भाग एक भरला असून त्यापैकी 3 हजार 745 विद्यार्थ्यांचे अर्ज तपासण्यात आले आहेत. तर 1 हजार 781 विद्यार्थ्यांचे अर्ज ऑटो व्हेरिफाय म्हणजेच आपोआप तपासण्यात आले आहेत तर 10 हजार 853 विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप तपासणे बाकी असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button