breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश; पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली |

कुरखेडा उपविभागांतर्गत मालेवाडा पोलीस मदत केंद्र हद्दीतील खोंब्रामेंढा व हेटाळकसाच्या जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवणारे सी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या नक्षलवादविरोधी अभियानात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सोमवारी म्हणजेच २९ मार्च २०२१ रोजी सकाळी साडेसात ते आठ दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलीस दलाला मिळालेल्या या यशामुळे सुरक्षा दलांचा आत्मविश्वास वाढला आहे. गडचिरोली:कुरखेडा पोलिस उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नॅक्सलवाद विरोधी अभियानाला आज सोमवार, २९ रोजी सकाळी ७.३० ते ८ या वेळेत झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले. यात 3 पुरुष व 2 महिला आहे. दरम्यान पोलिस दलाला मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेला आहे.

खोंब्रामेंढा- हेटाळकसाच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असून ६० ते ७०च्या संख्येत मोठ्या प्रमाणात नक्षली सहभागी झाली असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक गोयल यांच्या मार्गदर्शनात अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात जंगल परिसरात सी-६० पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता नक्षल विरोधी अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनिटे चाललेल्या या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले. त्यानंतर त्यांच्या मागावर असणारे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात तीन वेळा मोठी चकमक झाली. यामध्ये सोमवारी पाच नक्षलवादी ठार झालेत. त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी पाच नक्षलवादी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, नक्षवाद्यांच्या पहिल्या ठिकाणावरुन  ३०३ रायफल, काडतूस, नक्षल पिट्टू, ३ प्रेशर कुकर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब तसेच मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा व नक्षलवाद्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले आहे.

वाचा- सुएझ कालव्याने घेतला मोकळा श्वास! एव्हर गिव्हन जहाज काढण्यात अखेर यश

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button