breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का! मोठा नेता भाजपच्या वाटेवर?

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का लागणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा निकटवर्तीय, विश्वासू नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र हा नेता कोण याबाबतची स्पष्टता आलेली नाही. पण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता हा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. हा नेते नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. काँग्रेसचे नेते, पंजाबचे माजी राज्यापाल, माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या देखील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा    –    बारामती, शिरूरमधील नाराजांच्या मनधरणीसाठी फडणवीसांची धावाधाव

दरम्यान, ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अंबादास दानवे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, सुषमा अंधारे, प्रियांका चतुर्वेदी, किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button