आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

नोकरीच्या शोधासाठी तरुण दिल्ली, मुंबई, बंगळुरु वा पुण्यासारख्या मेट्रो शहरांकडे

आपली मुंबई आणि दिल्ली पिछाडीवर

आंतरराष्ट्रीय : देशात चांगले रग्गड वेतन मिळण्यासाठी तरुणांचा ओढा मोठ्या शहरांकडे असतो. अभ्यासपूर्ण झाल्यानंतर तरुण नोकरीच्या शोधासाठी दिल्ली, मुंबई, बंगळुरु वा पुण्यासारख्या मेट्रो शहरांकडे धाव घेत असतात. परंतू आता मोठे पॅकेज देण्याच्या बाबतीत आता मोठा बदल होताना दिसत आहे.

अलिकडेच Indeed चा नवा सर्वे समोर आला आहे. मोठा पगार मिळण्यासाठी पॉप्युलर सिटीजचा मागे टाकून नवीन शहरांचा दबदबा यात वाढत आहे. हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये आता वेतन वाढीचा वेग देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राजकीय राजधानी दिल्ली पेक्षा अधिक असल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वेक्षणात देशातील 1300 हून अधिक एम्प्लॉयर्स आणि 2500 हून अधिक कर्मचाऱ्याची मते नोंदवण्यात आली. यात फ्रेशर पासून ते अनुभवी प्रोफेशनल्स पर्यंतची मते आजमावून वेतन, खर्च, शहरी जीवनाचा स्तर आणि कामाचा ताण यांसारख्या सर्व घटनांवर संशोधन केले गेले.

हेही वाचा – ‘आलमट्टी धरण उंचीवाढीला विरोधाची महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडणार’; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

चेन्नईत फ्रेशर्सना मिळतोय सर्वाधिक पगार
सर्वेनुसार चेन्नई त्या युवकांसाठी एक चांगली संधी म्हणून पुढे येत आहे,ज्यांना आपली करियरची सुरुवात करायची आहे. कारण चेन्नईत फ्रेशरना सरासरी मासिक वेतन 30,100 दिले जात आहे. तर 5 ते 8 वर्षांचा अनुभव असणाऱ्यांसाी हैदराबाद सर्वाधिक पसंदीचे शहर बनत आहे. कारण हैदराबाद येथे अशा लोकांना सरासरी मासिक 69,700 वेतन मिळत आहे.

महागड्या शहरत वेतन कमी पडते
दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात भले नोकरीच्या संधी भरपूर असतील. परंतू येथील महागाईने लोकांचा खिसा खाली होत आहे. अहवालातील माहितीनुसार सुमारे 69% लोकांचे म्हणणे आहे की त्यांचा पगार शहरातील महागड्या राहाणीमानानुसार पुरेसा नाही.

दिल्लीत ही संख्या 96% टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. तर मुंबईत 95%, पुण येथे 94% आणि बंगलुरु येथे 93% लोकांनी हेच सांगितले आहे. याच थेट कारण म्हणजे महागडे भाडे, वाढता प्रवास खर्च, खाण्या-पिण्याच्या आवश्यक वस्तूंच्या महागड्या किंमती ज्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

आता छोटी शहरं तरुणांची पसंत
या वेगाने बदलणाऱ्या ट्रेंडनुसार आता युवकांना त्या शहरात नोकरी करायची आहे जेथे राहाण्याचा खर्च कमी असेल आणि चांगला पगार मिळेल.हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद आता अशी शहरं बनत आहे की जी प्रोफेशनल्सना चांगलं वेतन देत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button