पंतप्रधान मोदींना पत्र लिहित तरुणाची आत्महत्या; मरता मरता केली ‘ही’ मागणी
![Young man commits suicide by writing letter to PM Modi; The demand for ‘this’ made while dying](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/suicide-loksatta.jpg)
नवी दिल्ली |
मध्यप्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपण उत्तम डान्सर बनण्यास अपयशी ठरल्याचं सांगत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १६ वर्षीय तरुणाने आत्महत्येपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. हा मुलगा अकरावीत शिकत होता. या मुलाने रविवारी रात्री रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती झाशी रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी संजीव नयन शर्मा यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
शर्मा यांनी सांगितलं की, या मुलाने लिहिलेली कथित चिठ्ठी मृतदेहाशेजारी आढळून आली आहे. या चिठ्ठीत त्याने लिहिलं आहे की, त्याचं कुटुंब आणि मित्रमंडळींनी त्याला साथ न दिल्याने तो उत्तम डान्सर बनू शकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून त्याने ही चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्याने मोदींकडे एक मागणीही केली आहे. शर्मा यांनी सांगितलं की, या चिठ्ठीमध्ये या मुलाने एक म्युझिक व्हिडिओ बनवण्याची मागणी केली आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये अरिजीत सिंग याने गाणं गायलेलं असावं आणि नृत्यदिग्दर्शन नेपाळी कलाकार सुशांत खत्री याचं असावं. या पत्रात त्याने लिहिलं आहे की या म्युझिक व्हिडिओमुळेच त्याच्या आत्म्याला शांती लाभेल. तसंच त्याने पंतप्रधान मोदींकडे आपली शेवटची इच्छा पूर्ण करण्याची मागणीही केली आहे.