ताज्या घडामोडीविदर्भ

कुस्ती कोच वस्तादाचं अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

गुरू-शिष्याच्या नात्याला कलंक

अकोला : अकोल्यात एका खाजगी कुस्तीच्या केंद्रात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. येथील कुस्ती कोच ने (वस्तात) आपल्याकडे कुस्ती शिकण्यासाठी आलेल्या १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी बालसंरक्षणा कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तसेच घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ अकोला पोलिसांनी कुस्ती कोचला गजाआड केलं आहे. विशेष म्हणजे ही अल्पवयीन विद्यार्थिनी अजूनही या धक्क्यातून सावरली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ९ मे पासून बेपत्ता होती. तिचा शोध लागल्यानंतर महिला आणि बाल कल्याण समिती आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तिचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर जिथे ‘ती’ कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती. तिथल्या कुस्ती ‘कोच’ जयशंकर धुर्वे यांनी गैरकृत्य केल्याचं सांगितले. राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्याने जात असताना तिला बळजबरी सोबत न्यायचाही प्रयत्न केला, असाही आरोप मुलीने केला आहे. पोलिसांनी लागलीच यासंदर्भात कुस्ती कोचला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध अपहरणाच्या संशयावरुन आणि विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मुलीबाबत माहिती असतानाही कोचनं माहिती लपवली होती. पीडित मुलीवर किती दिवसांपासून गैरवर्तन सुरू होतं. याचाही तपास केला जाणार आहे. दरम्यान पीडित मुलगी नेमकं कोणाच्या दबावाखाली घरून निघाली होती? कुस्ती क्लासेसच्या नावाखाली आणखी कोणासोबत गैरवर्तन झालं का? याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणानंतर पालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक निलेश लेव्हंकर यांनी केले.

नेमकं काय घडलं?
जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश लेव्हंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसाहत भागात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी रागाच्या भरात घरातून निघाली. बराच वेळ होऊनही ‘ती’ घरी परतली नाही. कुटुंबीयांकडून तिचा शोध घेण्यात आला, पण तिचा सुगावा लागला नाही. अखेर ९ मे रोजी कुटुबियांनी पोलीस स्टेशन गाठलं. अन् मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलीस तिच्या शोधार्थ लागले. मुलीच्या मैत्रिणी आणि इतर नातेवाईकांकडून माहिती मिळाली की पीडित मुलीबाबत कुस्तीचा कोच जयशंकर धूर्वे (५४) यांना माहिती आहे.

पोलीस त्यांच्यापर्यत पोहचले. तिच्याबद्दल ‘धुर्वे’ यांना विचारणा केली. त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे देत आपल्या यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र सखोल चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. विशेष म्हणजे मुलगी बेपत्ता असल्यापासून शहरातल्या बालगृहात राहायला गेली होती.

एका टेबल टेनिस प्रशिक्षकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला होता. चक्क प्रशिक्षकानेच टेबल टेनिस शिकण्यासाठी आलेल्या मुलीचा विनयभंग केला होता. तसेच एका नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी वर्गासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा येथील शिक्षकाने विनयभंग केला होता. यापूर्वीही काही ठिकाणच्या कोचविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास करण्यात येत असून, कारवाई देखील सुरु आहे. मात्र तरीही काही कोचकडून अत्याचार थांबत नसल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button