‘व्हॅलेंटाईन्स डे’ १४ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? काय आहे यामागची रंजक कथा

Valentine Day | व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस मानला जातो. बहुतेक देशांमध्ये व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईनबद्दल अनेक प्रेमकथा आहेत पण व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस का निवडला गेला हे तुम्हाला माहिती आहे का?
‘ऑरिया ऑफ जॅकोबस डी वॉराजिन’ नावाच्या पुस्तकानुसार सेंट व्हॅलेंटाईन हे रोमचे धर्मगुरू होते. जगात प्रेम वाढवण्यावर त्यांचा विश्वास होता. त्याच्यासाठी आयुष्य फक्त प्रेमात होते. पण या शहराचा राजा क्लॉडियस याला त्याचे बोलणे आवडले नाही. राजाला वाटले की पुरुषांची बुद्धिमत्ता आणि शक्ती या दोन्ही गोष्टी प्रेम आणि लग्नाने संपतात. या कारणास्तव त्याच्या राज्यात सैनिक आणि अधिकारी विवाह करू शकत नव्हते.
हेही वाचा : आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
सेंट व्हॅलेंटाईनने राजा क्लॉडियसच्या या आदेशाला विरोध केला आणि रोमच्या लोकांना प्रेम आणि विवाहासाठी प्रेरित केले. एवढेच नाही तर अनेक अधिकारी आणि सैनिकांचे विवाहही त्यांनी केले. यामुळे राजा संतप्त झाला आणि त्याने १४ फेब्रुवारीला सेंट व्हॅलेंटाइनला फाशी दिली. त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
संत व्हॅलेंटाईनने मृत्यूशय्येवर असलेल्या जेलरची अंध मुलगी जेकोबस यांना डोळे दान केले होते असे म्हटले जाते. सेंटने जेकोबसला एक पत्र देखील लिहिले, ज्याच्या शेवटी त्याने ‘युवर व्हॅलेंटाईन’ लिहिले. प्रेमासाठी बळी पडलेल्या व्हॅलेंटाइनची ही कथा होती.