breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

Women’s Day | आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चलाच का साजरा करतात?

International Women’s Day | ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिला दिन सर्व महिलांना समर्पित आहे. या दिवशी आपण त्या महिलांचे स्मरण करतो ज्यांनी देशाला गौरव मिळवून दिले आहे, स्वत:साठी एक खास प्रतिमा सोडली आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी आपण त्या महिलांचे स्मरण करतो ज्यांनी आपल्या तळमळीने पुढे जाऊन अनेक उंची गाठली. तसेच प्रत्येक पुरुष आपल्या घरातील महिलांना, मैत्रिणींना शुभेच्छा देऊन हा दिवस आनंदाने साजरा करतात. या लेखात आपण या दिवसाचा इतिहास जाणून घेणार आहोत.

इतिहासात प्रथमच, आंतरराष्ट्रीय महिला दिन २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्कमध्ये राजकीय कार्यक्रम म्हणून साजरा करण्यात आला. यानंतर सोव्हिएत युनियनने या दिवशी राष्ट्रीय सुट्टी घोषितकेली. त्या दिवसापासून आजपर्यंत अनेक देश आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहेत.

हेही वाचा      –      शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

सुरुवातीला काही लोक जांभळ्या रंगाच्या फिती लावून हा दिवस साजरा करत असत. हा दिवस विशेषतः जगभरातील महिलांवरील भेदभाव संपवण्यासाठी साजरा केला जातो. याशिवाय महिलांचा विकास लक्षात यावा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा देखील विचार व्हावा म्हणून हा दिवस अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महिला दिन साजरा करण्याचे अनेक मार्ग असले तरी या दिवशी जांभळा, हिरवा आणि पांढरा या रंगांना विशेष महत्त्व आहे. महिला दिनाशी संबंधित या रंगांचे महत्त्व जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व काय? 

८ मार्चला जगभरात महिला दिन साजरा होत असतो. महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे समाजातील महिलांना आदर आणि प्रेम देण्यासाठी जागरूक करणे हा आहे. तसेच महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे हा देखील यामागचा उद्देश आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात असतो. याशिवाय महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि समाजातील असमानता दूर करण्यासाठी या दिवसाला फारच महत्त्व आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button