शेतात काम करणाऱ्या युवकावर गोळी कुणी झाडली ? पोलिसांकडून तपास सुरू
![Who shot the youth working in the field? Police are investigating](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/New-Project-30.jpg)
नागपूर : मध्यप्रदेशातील लांजी-बालाघाट येथील शेतात काम करणाऱ्या गौरव कृष्णकुमार कबीर (२१, भोलेगाव) या युवकावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. गौरवला नागपुरात आणण्यात आले असून त्याच्या बरगडीत फसलेली गोळी काढण्यात आली आहे. मात्र, या गोळीबार कांडात नागपुरातील छत्तीगडमधील रायपुरात आयोजित राफयल शुटिंग स्पर्धेसाठी गेलेल्या काही स्पर्धकांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव कबीर हा गेल्या १६ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता शेतात गेला होता.
दरम्यान, त्याच्या बरगडीत गोळी लागली. त्याने मित्राला फोन करून बोलावले. मित्रांनी गौरवला गोंदियातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी नागपुरात नेण्याचा सल्ला दिला. गौरवला सदरमधील खान हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर गौरवच्या बरगडीतून गोळी काढली. हे गोळीकांड कसे घडले?, कुणी गोळी झाडली? कुणी रायफल शुटर्सचा सहभाग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.