breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

WHO ने कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सांगितला ‘हा’ उपाय

बीजिंग | जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक ट्रेडोस अधनोम घेब्रेरियस यांनी संपूर्ण जगाला एकत्रित होऊन COVID-19 चा पराभव करण्याचे आवाहन केले आहे. एकता ही कोरोना विषाणूचे रामबाण औषध आहे, यावर त्यांनी भर दिला.

ट्रेडोस म्हणाले, कोरोना विषाणू (COVID-19) हा संपूर्ण जगासाठी मिळालेला एक इशारा आहे. त्याचबरोबर एक समान भविष्य घडविण्याची जगाला एक चांगली संधी आहे. युरोपियन कमिशनने आयोजित केलेल्या कोविड-१९ आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी ७.४ अरब युरो निधी संकलन केल्याबद्दल कौतुक केले. कोविड-१९चा पराभव करण्याचे मार्ग शोधले पाहिजे. त्यासाठी उपाय-योजना करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. प्रत्येक मनुष्याचे रक्षण केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेपासून रशियापर्यंत, इस्त्राईलपासून जर्मनीपर्यंत, जगातील सर्व देश सध्या कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी संजीवनी शोधण्याचा आणि त्याचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु. निराशाजनक बातम्यांच्या प्रकाशझोतात, कोरोनाची संजीवनी रेमेडीव्हिएअर एक आशा म्हणून उदयास आली आहे. बर्‍याच देशांनी असा दावा केला आहे की त्यांनी कोरोना लस बनविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button