breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

WhatsApp लवकरच घेऊन येणार एक नवे फिचर, युजर्सची Storage ची समस्या होणार दूर

फेसबुकचे मालकी हक्क असलेले व्हॉट्सअॅपचे भारतात करोडोंच्या संख्येने युजर्स आहेत. युजर्ससाठी व्हॉट्सअॅपकडून बदलत्या ट्रेन्ड नुसार नवे अपडेट्स आणि फिचर्स रोलआउट केले जातात. मात्र आता व्हॉट्सअॅपमुळे फोनमधील स्टोरेज अधिक व्यापला जात असल्याने त्यावर कंपनीकडून एक तोडगा काढण्यात येणार आहे.

या समस्येसंदर्भात व्हॉट्सअॅप लवकरच एक नवे फिचर रोलआउट करणार आहे. हे नवे फिचर अॅन्ड्रॉइड बीटा युजर्ससाठी असणार आहे. त्यामुळे युजर्सला स्टोरेजमुळे उद्भवणारी समस्या दूर होणार आहे.

कंपनीकडून अॅन्ड्रॉइड बीटा वर्जन 2.20.201.9 रोलआउट केले आहे. त्यामध्ये युजर्सला स्टोरेज सेक्शनमध्ये नवे युजर इंटरफेससह नवे टूल्स दिसून येणार आहेत. WhatsApp ला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo यांनी ते ट्रॅक केले आहे. हे नवे फिचर बीटा युजर्ससाठी रोलआउट केले आहे. कंपनी हे फिचर आता लवकरच नॉन-बीटा अॅन्ड्रऑइड युजर्ससाठी रोलआउट करु शकते.

WhatsApp च्या नव्या फिचरच्या माध्यमातून लार्ज सेक्शनमध्ये अधिक स्टोरेज व्यापणाऱ्या फाइल्स पाहता येऊ शकणार आहेत. त्याचसोबत यामध्ये फॉरवर्ड फाइल्सचे सुद्धा सेक्शन असणार आहे. जे युजर्सला अनावश्यक फाइल्स वेगळ्या करण्याचे सुद्धा ऑप्शन मिळणार आहे. युजर्सला आपले चॅट आणि कॉन्टेक्स ही पाहता येणार जे अधिक स्पेस घेतात. तर कंपनी हे फिचर लवकरच iPhone साठी सुद्धा रोलाउट करु शकते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपकडून दिलेल्या नव्या अपडेटनुसार, युजर्सना WhatsApp Web च्या माध्यमातूनही आता व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. म्हणजे आता जर तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुम्हाला त्याच्या माध्यमातूनही व्हीडिओ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तर नव्या फीचरमुळे युजर्सला मेसेंजर रूम बनवता येणार आहे. या व्यतिरिक्त फेसबुक कडून सुद्धा त्यासाठी टेस्टिंग़ सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यासाठी तुमच्या WhatsApp Web version 2.2031.4 असणे गरजेचे असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button