किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे? कधीपासून सुरू झाली? जाणून घ्या कार्डचे नेमके फायदे…
Kisan Credit Card : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात शेती क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी किसान क्रेडिट कार्डवर फक्त 3 लाख रुपयांची मर्यादा मिळत होती. किसान क्रेडिट कार्डमुळे ७.७ कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध होईल, असेही सीतारामण यांनी म्हंटले.
शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पुरेसे आणि वेळेवर कर्ज मिळावे यासाठी किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेती व संबंधित कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना ९ टक्के व्याजाने अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावरील व्याजावर 2 टक्के सूटही देते. तर ३ टक्के त्वरित परतफेड प्रोत्साहन देण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांना वार्षिक ४% या अत्यंत सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध होईल. किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील पाच वर्षांपर्यंत आहे.
केसीसीमध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर अत्यंत स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाते. हे कर्ज शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले जाते. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाते. हे कर्ज शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले जाते. अशा परिस्थितीत शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके आणि डीएपी शेतीसाठी खरेदी करण्यासाठी KCC मर्यादेचा वापर करू शकतात.
हेही वाचा – ‘विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करणारा अर्थसंकल्प’; पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशात लहान शेतकरी मोठ्या संख्येने आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडे शेतीसाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केसीसी योजना सुरू केली होती. हे कार्ड एक मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड आहे ज्यात पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर आणि इंटरनॅशनल स्टँडर्डऑर्गनायझेशन इंटरनॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर (आयएसओ आयआयएन) आहे, जेणेकरून सर्व बँकांच्या एटीएम आणि मायक्रो एटीएममध्ये प्रवेश शक्य होईल.
किसान क्रेडिट कार्ड योजना 26 वर्षांपूर्वी 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2012 मध्ये ही योजना सुलभ करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी सुधारणा करण्यात आली. किसान क्रेडिट कार्ड 2023 अंतर्गत, आपण दोन प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता, बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता, दुसरे म्हणजे पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपण अर्ज करू शकता. 30 जून 2023 पर्यंत असे कर्ज घेणाऱ्यांची संख्या 7.4 कोटींहून अधिक होती. ज्यावर 8.9 लाख कोटींहून अधिकची थकबाकी दिसली.