Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

“युरोपला युद्ध हवं असेल तर आम्ही तयार”; व्लादिमीर पुतिन यांचा इशारा

Vladimir Putin | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपातील देशांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. युरोपने रशियाच्या विरोधात युद्ध सुरु केलं तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ हे विसरु नका. रशियाला युरोपशी युद्ध करण्यात काहीही रस नाही. पण जर तुम्ही सुरुवात केलीत तर सगळ्या गोष्टी इतक्या लवकर संपुष्टात येतील की तुमच्याकडून चर्चा करायलाही कुणी उरणार नाही, असा इशाराच पुतिन यांनी दिला आहे.

युक्रेनशी आम्ही जे युद्ध करतोय ते पूर्णपणे नाही. आम्ही सर्जिकल स्ट्राईक सारख्या काही मर्यादित कारवाया करत आहोत. पण जर युरोपला युद्ध हवं असेल तर थेट युद्ध होईल. युरोपने सुरुवात केली तर रशिया पूर्ण ताकदीने उत्तर देईल असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा       :          महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध सुरु होऊन चार वर्षे झाली आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातील देशाशी हा सर्वात मोठा संघर्ष आहे. दरम्यान रशिया अद्यापही युक्रेनवर ताबा मिळवू शकलेला नाही. युक्रेनला युरोपातील देशांकडून आणि अमेरिकेकडून मोठा पाठिंबा मिळतो आहे. युरोपियन देशांचं म्हणणं आहे की पुतिन यांनी जर युक्रेनशी युद्ध जिंकलं तर ते कुठल्याही नाटो देशावर हल्ला करु शकतात. मात्र पुतिन यांनी हा दावा खोडसाळ असल्याचं म्हटलं आहे. युरोपियन देशांनी चर्चेचे मार्ग बंद केले आहेत. त्यामुळेच आम्ही हे म्हणत आहोत की जर युरोपला युद्ध हवं असेल तर आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button