breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा

UPSC Chairperson Manoj Soni Resigns | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

मनोज सोनी हे २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. १६ मे २०२३ रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते. तसेच प्रशासकीय व्यवस्थेमधील आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अशा उच्च अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केले जाते.

हेही वाचा     –        मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, टेम्पोची ट्रकला धडक, एकाचा मृत्यू 

५९ वर्षीय मनोज सोनी हे राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मानले जातात. तसेच आंतरराष्ट्रीय संबंधात त्यांचा अभ्यास आहे. सरदार पटेल विद्यापीठात त्यांनी १९९१ ते २०१६ या काळात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे अध्यापन केले. मनोज सोनी यांनी गुजरातमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे २००९ ते २०१५ या काळात कुलगुरूपद भूषविले होते. तसेच बडोद्यातील महाराजा सयाजीराजे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून २००५ ते २००८ या काळात काम पाहिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button