चोपड्यानजीक अपघातात मामा-भाची यांचा मृत्यू
![Uncle-niece dies in an accident near Chopdya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/dead-1-1-780x470.jpg)
चोपडा तालुक्यातील रेल येथील मारुती मंदिराजवळील नागमोडी वळणावर शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीला मालमोटारीने जोरदार धडक दिली. त्यात मामा-भाची यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहावर्षीय मुलीचा समावेश आहे.चोपडा तालुक्यातील रेल येथील मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणार्या दुचाकीला समोरून येणार्या मालमोटारीने जोरदार धडक दिली. अपघातात सहावर्षीय विधी कोळी आणि दुचाकीस्वार आबा कोळी (रा. दहिंदुले, ता. धरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला..
अन्य एक महिला गंभीर जखमी झाली असून, दीडवर्षीय चिमुकला सुखरूप आहे. अपघाताची माहिती मिळताच चोपडा येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती. जखमी महिलेला जळगाव येथे हलविण्यात आले. मृत हा बहिणीला घेऊन विरवाडे (ता. चोपडा) येथील आपल्या घरी जात होता. घटनस्थाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, हवालदार प्रदीप राजपूत, जितेंद्र चव्हाण, प्रमोद पवार, हेमंत कोळी यांनी धाव घेत पंचनामा केला. चोपडा येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.