TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

ट्विटरची मालकी आता एलन मस्क यांच्याकडे; पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

नवी दिल्ली ।

टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहेत. एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेताच ट्विटचे आधीचे सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेड सेगल यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एवढचं नाही तर त्यांना कंपनीच्या मुख्यालयातूनही बाहेर काढले आहे.

एलन मस्क यांनी यावर्षी 13 एप्रिल रोजी ट्विटर खरेदीची घोषणा केली, त्यांनी प्रति शेअर $ 54.2 या दराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म $ 44 बिलियनमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली होती. पण नंतर स्पॅम आणि फेक अकाऊंटमुळे त्यांनी हा करार थांबवला. यानंतर 8 जुलै रोजी मस्क यांनी करार तोडण्याचा निर्णय घेतला, याविरोधात ट्विटरने न्यायालयात धाव घेतली, पण नंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला मस्क यांनी आपली भूमिका बदलत पुन्हा करार पूर्ण करण्यास सहमती दर्शवली. डेलावेर न्यायालयाने 28 ऑक्टोबरपर्यंत हा करार पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर एलन मस्क यांनी एक दिवस आधी ट्विटरच्या कार्यालयात पोहोचून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

यानंतर आता मस्क यांनी ट्विटरची अधिकृत सूत्र हाती घेताच सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि लीगल अफेयर पॉलिसी हेड विजया गड्डे यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असून त्यामुळे ट्विटरच्या सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचे संकट उभ राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान गुरुवारी एलन मस्क यांनी ट्विट करत ट्विटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली आहे. भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे. यामुळे मी ट्विटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करु शकतील, सध्या सोशल मीडियावर अतिउजवे आणि अति डावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल, अस ट्विट मस्क यांनी केले होते. तसेच ट्विटर मुख्यालयाला भेट देत ट्विटरच्या बायोमध्ये ट्विट चीफ असे लिहिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button