breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

१ जून महिन्यापासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम

1 June New Rules | मे महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. मे महिन्यानंतर आता जून महिना लागणार आहे. नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून अनेक नियम बदलणार आहेत. १ जूनपासून कोणते नवीन आर्थिक नियम लागू होतील ते खालील मुद्द्याच्या आधारे जाणून घेऊयात.

गॅस सिलिंडरच्या दरात बदल : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिडंरच्या दरात बदल होत असतात. याआधी ९ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी झाले होते. व्यावसायिक गॅसदेखील एप्रिल महिन्यात स्वस्त झाला होता. आता जूनमध्ये याच्या किमती वाढणार की घटणार ते पाहावं लागेल.

आधार कार्ड बदल : १४ जूनपर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्डमध्ये बदल करता येतील. आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डमध्ये बदल करायचा असल्यास प्रत्येक अपडेटसाठी ५० रुपये द्यावे लागतील.

हेही वाचा    –    ‘सहा महिन्यांनी मोठा राजकीय भूकंप होणार’; पंतप्रधान मोदींचं विधान चर्चेत

ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टच्या नियमात बदल : सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात बदल केला असून आता सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजे RTO ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. त्याऐवजी, आता खाजगी संस्थांना टेस्ट घेण्यास आणि प्रमाणपत्रे देण्यास अधिकृत करण्यात आले असताना १ जूनपासून नवा नियम लागू होईल.

अल्पबचत योजनेच्या व्याजदरात बदल : पीपीएफ, KVP आणि सुकन्या समृद्धीसारख्या छोट्या बचत योजनेचे व्याजदर दर तिमाहीत बदलतात. अनेकदा जुने व्याजदर कायम ठेवले जातात, त्यामुळे आता ३० जूनला नव्या दरांबाबत सरकारच्या नियमांकडे लोकांचे लक्ष लागून असेल.

वाहतुकीच्या नियमात बदल : अल्पवयीन मुले गाडी चालवताना दिसल्यास त्यांच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे. हा दंड २५ हजार रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच २५ वर्षांपर्यंत लायन्सन्स देण्यात येणार नाही. यासोबतच वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चावल्यास २००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. यापूर्वी यासाठी १००० रुपये आकारले जात होते. तसेच लायसन्स नसताना गाडी चालवल्यास ५०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button