यंदाच्या महाकुंभमध्ये होणार ‘हे’ चार विश्वविक्रम, जाणून घ्या सविस्तर..

Mahakumbh 2025 | भारतीय संस्कृतीत श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा सोहळा म्हणून महाकुंभमेळाची जगभरात ओळख आहे. म्हणूनच मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरु असणारा हा धार्मिक उत्सव जगासाठी लक्षवेधी ठरला आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिळ सोहळा अशी ओळख झालेल्या महाकुंभमध्ये आता पुढील चार दिवसांमध्ये चार विश्वविक्रम होणार आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी १५००० स्वच्छता कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरातील गंगा नदीच्या काठाचा १० किमी लांबीचा भाग स्वच्छ करतील. अशा प्रकारे भारत स्वतःचाच विक्रम मोडत एक नवीन टप्पा गाठणार आहे.
हेही वाचा : ‘सुरेश धस, धनंजय मुंडे आणि कराड एकच’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
१५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या विश्वविक्रमात प्रयागराजमधील संगमातील पाण्याचा प्रवाह ३०० हून अधिक लोक स्वच्छ करतील, जो एक नवीन विक्रम असेल.
१६ फेब्रुवारी रोजी त्रिवेणी मार्गावरील परेड ग्राउंडवर एकाच वेळी १००० ई-रिक्षा चालवण्याचा विक्रमही केला जाईल. तर सोमवार १७ फेब्रुवारी रोजी १० हजार लोकांच्या हाताचे ठसे उमटविण्याचा रेकॉर्डही बनवला जाईल. या विश्वविक्रमाची नोंद ठेवण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीमही प्रयागराजमध्ये आले आहे.