breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ ३ जबरदस्त योजना! कमी जोखीम मध्ये अधिक परतावा

Post office Scheme : केंद्र सरकार पोस्टाद्वारे कायमच नवनवीन योजना राबवत असतात. जर तुम्हाला छोटी गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. गुंतवणूकदारांना पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पब्लिक प्रोव्हिडेंट फंड योजना, सुकन्या समृद्धी योजना या तीन सर्वात फायदेशीर योजना आहेत. आजकाल कित्येक लोक पोस्टाच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. आज आपण पोस्टाच्या या तीन योजनांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये एफडीपेक्षा अधिक परतावा मिळतो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना :

ज्येष्ठ नागरिक बचत योजना पोस्टाच्या वतीने चालवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीवर ८ टक्के इतका व्याज दर मिळत आहे. तुम्ही एखाद्या बँकेत जर एफडी केली तर तुम्हाला एफडीवर कोणतीही बँक इतका जास्त व्याज दर देत नाही. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास दर तीन महिन्याला व्याज बँकेच्या खात्यात जमा होते. या योजनेत जर तुम्हाला खाते उघडायचे असतील तर जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता. तसेच महत्वाचे म्हणजे ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकाला खात घडायचं असेल तर एकटे किंवा आपल्या पत्नीसोबत मिळून जॉईंट खाते खोलू शकतात.

हेही वाचा – मुख्यमंत्री केसीआर यांचा पंढरपूरला येताना मटनाचा शाही बेत! मिटकरींचा गंभीर आरोप

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड :

पोस्टाची पब्लिक प्रोव्हिडेंट फंड योजना देखील फार फायद्याची आहे. या योजनेतून चांगला परतावा मिळतो. तसेच ही योजना पोस्ट बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या योजनेला पीपीएफ (PPF) असेही म्हणतात. ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास गुंतवणुकीवर कोणताही टॅक्स लागत नाही. या योजनेंतर्गत ७.१ टक्के इतका व्याद दर देण्यात येतो.

सुकन्या समृद्धी योजना :

पोस्टाची सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. ही योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अधिक चांगलीआहे. ज्या गुंतवणूकदारांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैशांची तरतूद करायची आहे, ते या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात. या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ७.६ दराने व्याज देण्यात येतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button