पंढरपूरच्या विठ्ठलाचे निष्ठावंत भक्त गणपत तात्याबा जानभरे यांचे दुःखद निधन

जिंती | येथील ह.भ.प. कै. गणपत तात्याबा जानभरे (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. पंढरपूरच्या विठ्ठलावर अपार श्रद्धा ठेवून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भक्ती, सेवा व साधेपणात व्यतीत केले.
त्यांचे जीवन म्हणजे भक्तीचा जिवंत दीपच होता. विठ्ठल चरणी निष्ठा ठेवून त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे तर अनेकांचे जीवन प्रकाशमान केले. शांत स्वभाव, प्रेमळ बोलणे व संस्कारमय जीवनशैलीमुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून गेले.
त्यांच्या जाण्याने जिंती परिसरावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांसह संपूर्ण भक्त परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देह जरी आपल्यातून निघून गेला असला, तरी त्यांची भक्ती, श्रद्धा व संस्कार सदैव स्मरणात राहतील, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच सर्वांची प्रार्थना आहे.




