breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ; निर्बंधातून सूट नको, आयएमएचा इशारा

नवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र दिसत असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या एका इशाऱ्यामुळे चिंता वाढणार आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे आणि ती लवकरच येईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी इतक्यात कोरोना निर्बंधातून सूट देऊ नये, अशा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.

कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आणि कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे केल्यानेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल,असे आयएमएने आपल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक पुरावे आणि महामारीचा इतिहास पाहता तिसरी लाट नक्की येणार आहे. पण आता आपल्या पाठीशी दोन लाटा हाताळण्याचा अनुभव आहे, असेही आयएमएने म्हटले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लोकांनी तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. लोकांनी गर्दी करणे टाळावे. पर्यटन, धार्मिक उत्सव असे कार्यक्रम आवश्यक असले तरी ते काही महिने पुढे ढकलता येतील. धार्मिक उत्सवांना परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील. असे कार्यक्रम कोरोनाचे ‘सुपरस्प्रेडर इव्हेंट’ ठरू शकतात. त्यामुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण दिल्यासारखे होईल, असे आयएमएने म्हटले आहे. सरकारने आणखी तीन महिने कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करावे आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button