देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,15,14,331 वर
- 24 तासांत 39,726 नवे रुग्ण
नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असतानाच आता देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत 39,726 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 154 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,15,14,331 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,59,370 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 20,654 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,10,83,679 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 2,71,282 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
India reports 39,726 new COVID19 cases, 20,654 recoveries and 154 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,15,14,331
Total recoveries: 1,10,83,679
Active cases: 2,71,282
Death toll: 1,59,370Total vaccination: 3,93,39,817 pic.twitter.com/tiVP1V9UZs
— ANI (@ANI) March 19, 2021
दरम्यान, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच परदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.