देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,12,62,707 वर
![The number of corona victims in the state is at 32,29,547](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/1800x1200_coronavirus_1.jpg)
- 24 तासांत 17,921 नवे रुग्ण
नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थितीबाबत चिंता वाढत असतानाच आता देशभरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत 17,921 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 133 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,12,62,707 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,58,063 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 20,652 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,09,20,046 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,84,598 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
वाचा :-देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस, लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग
दरम्यान, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे, मात्र देशाची एकूण रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच परदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.