अभिनेत्याने रागात मंदिराच्या दरवाजाला मारली लाथ, आता चांगलाच अडकला वादात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Actor-Mandir-Door-700x470.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो बूट घालून मंदिराच्या गेटला लाथ मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शूटिंगचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या वादग्रस्त व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
अशा परिस्थितीत युजर्सनी ट्विटरवर खेसारी लाल यादव यांच्या विरोधात निदर्शने केली आणि त्यांची तक्रारही मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर करण्यात आली. या प्रकरणी खेसारी लाल यादवच्या अडचणी वाढू शकतात, असे मानले जात आहे. त्याचवेळी, अभिनेत्याने या प्रकरणावर स्पष्टीकरण देखील दिले आहे. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण ते जाणून घेऊ.
हे प्रकरण गोरखपूरच्या पिपराइच नगर पंचायतीमधील भगवान मोतेश्वर नाथ मंदिरातील आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा शूटिंगचा भाग असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये खेसारी मंदिराच्या दाराला लाथ मारून आत शिरताना दिसत आहे. त्यानंतर तो मंदिरात प्रवेश करतो आणि गुंडांना मारहाण करतो. मात्र मंदिराच्या गेटवर लाथ मारण्याच्या सीनकडे लोकांचं लक्ष गेलं आणि त्यांनी याचा निषेध करायला सुरुवात केली.