ज्येष्ठा गौरी विसर्जन करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; जाणून घ्या शुभमुहूर्त
![Take care of these things while doing Jyeshtha Gauri immersion; Know the auspicious time](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Gauri-Visarjan-780x470.jpg)
Gauri Visarjan | गणेशोत्सवाचा सण सगळीकडेच अगदी जल्लोषात साजरा केला जात आहे. तसेच घरोघरी गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या गौराईचं विसर्जन अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पाडावे.
गौरी विसर्जनाचा मुहूर्त काय आहे?
आज दुपारी म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी १ वाजून ३१ मिनिटांनी ते रात्री ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत गौराईच्या विसर्जनाचा मुहूर्त आहे. या कालावधीत तुम्ही गौरी विसर्जन करु शकता.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनाला; संजय राऊतांचा निशाणा
गौरी विसर्जन करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या :
गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ अर्पण करावेत.
गौरी विसर्जनाच्या वेळी ५ सौभाग्यवती महिलांना बोलावून वाण द्यावा.
गौरीची आरती झाल्यानंतर देवीवर अक्षता वाहून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा.
देवीच्या विसर्जनानंतर त्यातली थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवावी.