सुशीला कार्की नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान बणण्याची शक्यता
सुशीला कार्की नेपाळ सुप्रीम कोर्टाच्या माजी चीफ जस्टिस्ट
मुंबई : नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधानांबाबत मोठी बातमी समोर आली आहे, सुशीला कार्की या नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान बणण्याची शक्यता आहे. सुशीला कार्की या नेपाळ सुप्रीम कोर्टाच्या माजी चीफ जस्टिस्ट आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार Gen-Z ची एक ऑनलाईन बैठक पार पडली, या बैठकीमध्ये तब्बल 5000 लोक सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला न्यायधीश आहेत, नेपाळमध्ये Gen-Z च्या आंदोलनानंतर तेथील सरकार उलथलं आहे. तेथील ओली सरकार कोसळलं आहे. या आंदोलनानंतर राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह पंतप्रधान केपी शर्मा यांच्यासह तब्बल दहा मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या देशात लष्कराची सत्ता आहे. नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर नेपाळमध्ये मोठं आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे, आंदोलकांनी नेपाळच्या संसद भवनाला देखील आग लावली, या आंदोलनामध्ये आतापर्यंत 24 लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांचं नाव समोर येत आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
कोण आहेत सुशीला कार्की?
73 वर्षांच्या सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. सोबतच त्या चीफ जस्टिस देखील होत्या, सुशीला कार्की या एक वर्ष नेपाळच्या चीफ जस्टिस होत्या, 30 एप्रिल 2017 रोजी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला, प्रस्ताव मंजूर झाल्यानं त्यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं. कार्की यांना एकूण सात भावंड असून, कार्की या त्यापैकी सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी आपलं बहुतांश शिक्षण हे भारतामधील बनारस हिंदू विद्यापीठातून पूर्ण केलं आहे, त्यांनी नेपाळमध्ये अनेक वर्ष वकिली देखील केली. सध्या नेपाळमध्ये लष्करी राजवट आहे, मात्र आता सत्तेची सूत्र कार्की यांच्या हातात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे सुशीला कार्की या नेपाळच्या पंतप्रधान होऊ शकतात.




