TOP Newsताज्या घडामोडीलेख

सरकारी योजना : ‘या’ योजनेत मिळतंय ‘इतकं’ अनुदान, तरुण-तरुणींसाठी मोठी संधी!

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, होतकरु युवक/युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP) या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या मार्गदर्शनाने व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली जिल्हा उद्योग केंद्र (DIC) व जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय (KVIB) यांच्यामार्फत करण्यात येते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) –

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना पूर्णपणे ऑनलाईन आहे. या योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले असून सदर पोर्टल सुलभतेने कार्यान्वित झालेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी लाभार्थ्याची यात स्वगुंतवणूक ५ ते १० टक्के, बँक कर्ज ६० ते ८० टक्के व राज्य शासनाचे अनुदान १५ ते ३५ टक्के, असं स्वरूप माहीत असणं आवश्यक आहे.

हेही वाचा – भोसरीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर

पात्रतेचे निकष : उत्पादन उद्योग, कृषिपूरक उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र.
उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी प्रकल्प मर्यादा रु. ५० लाख व सेवा क्षेत्रातील आणि कृषि आधारीत/प्राथमिक कृषी पक्रिया उद्योग प्रकल्पांसाठी प्रकल्प मर्यादा रु. २० लाख आहे.

या योजनेच्या लाभार्थीची शैक्षणिक पात्रता रू. १० लाखांच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान सातवी पास व रू. २५ लाखाच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान दहावी पास आहे. राज्य शासनाकडून प्रकल्प मंजूरीच्या १५ ते ३५ टक्के इतके आर्थिक साहाय्य अनुदान स्वरुपात मिळते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button