Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

तिरुपती मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी

Tirupati Stampede | आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थानमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या देवस्थानमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन समितीकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही बुधवारी रात्री तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून किमान ३० जण जखमी झाले आहेत.

बुधवारी संध्याकाळी तिरुपती देवस्थानमधील बैरागीपट्टेडाजवळ ही चेंगराचेंगरीची घटना घडली. यात जखमी झालेल्या ३० रुग्णांवर नजीकच्या रुइया हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या ३० पैकी अनेकांना गंभीर जखमा झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या सहा व्यक्तींपैकी तीन महिला आहेत. आंध्र प्रदेश सरकारनं या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा    –      प्लास्टिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध : आमदार महेश लांडगे

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. गुरुवारी त्यांनी तिरूमला देवस्थानला भेट दिली व मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सदर परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य ते उपचार होतील याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचं चंद्राबाबू नायडूंनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button