breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सहा ठार

नवी दिल्ली |

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात बुधवारी करण्यात आलेल्या पहाटेच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले. एका मोठ्या घरावर बॉम्बफेक करून ते जमीनदोस्त करण्यात आले. त्यातच तेथे जवळपास राहणाऱ्या सहा जणांचा अंत झाला. लष्कराने म्हटले आहे की, आम्ही हल्ल्यांची व्याप्ती वाढवली असून हमास शासित प्रदेशात अग्निबाणांचा मारा सुरू असताना दक्षिणेकडे हवाई हल्ले सुरू करण्यात आले आहेत. अल अस्तल कुटुंबातील चाळीस जण एकाच मोठ्या घरात पूर्वी राहत असत. त्या घरावर हल्ला करण्यात आला असता त्याचा ढिगारा कोसळून सहा जण ठार झाले.

दक्षिणेकडील खान युनूस शहरात इशारा देण्यासाठी अग्निबाणाचा मारा केला होता. त्यानंतर सर्वांना तेथून पळण्याची संधी देण्यात आल्यानंतर हवाई हल्ला करण्यात आला. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले असून खान युनूस व रफाह येथे ५२ विमानांनी ४० भूमिगत लक्ष्यांवर २५ मिनिटांत हल्ले केले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, हल्ल्यात एक महिला ठार झाली असून आठ जण जखमी झाले आहेत. हमास संचालित अल अकसा रेडिओने म्हटले आहे की, त्यांचा एक वार्ताहर गाझातील हल्ल्यात ठार झाला.

वाचा- इमारत जमीनदोस्त करताना अधिकाऱ्यांना मारहाण; गुन्हा दाखल

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button